Sunday, 17 May 2020

स्वीकार भाग 4

स्वीकार भाग 3 इथे वाचा

स्वीकार भाग 5 वाचण्यासाठी इथे क्लीक करा

हाय मी फुलरानी, मला रवि सोबत बोलायचे आहे.''

''मीच बोलतोय,'' कोण आहे ही या विचारात,''काय काम काढलेत आपण ? हे बघा मला क्रेडिट कार्ड ही नको किंवा लग्नासाठी मुलगीही नको आहे. मी एकटाच इनफ़ आहे माझ्यासाठी."

''अरे नाही मी कोणी सेल्स गर्ल नाही. मला सहज तुला भेटायचे आहे.''

''कशाला ?'' आवाज़ावरून वय लहान वाटते. राधाने तर कोणाला माझ्या मागे लावले नाही ना. अश्या विचारात असतांनाच फूलरानीने त्याची तंद्री भंग केली. ''तुमची मुलाखत घ्यायची आहे. सतत भटकंती करनारयांवर डॉक्यूमेंट्री बनवतेय. त्या डॉक्यूमेंट्री साठी.''

"साॅरी माझ्याजवळ वेळ नाही." असं म्हणून रविने काॅल कट केला. फुलराणीने एका हॅकर मित्राकडून रवीचे फेसबुक हॅक करून मोबाईल नंबर मिळवला होता. फुलराणीला केवळ रविचं लोकेशन ट्रॅक करायचं होतं. जे झालं. सुदैवाने रवि लेह लदाख मधे म्हणजे भारतातच होता. ज्यामुळे फुलराणीला त्याला भेटनं कठिण गेलं नाही. रवि तिथं मागील दोन महिन्यांपासून टॅक्सी ड्रायव्हर आणि गाइड म्हणुन काम करत होता. उन्हाळा असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती.
फुलराणी सरळ त्याच्या रूमवर जाऊन धडकली.

"आराधनाला ठीक करण्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे." फुलराणीने त्याला रोकठोक सांगुन दिले.

"कोण आराधना? मला नाही आठवत!", सिगरेट ओढत तो म्हणाला, "प्लिज मला एकटे राहू दे आणि माझ्या बहीणीला सांग माझा पिच्छा पुरवू नको."

"हे बघा मला लग्न या विषयावर पुस्तक लिहायचे आहे म्हणून अमनसोबत लग्न करायचं आहे म्हणून लवकरात लवकर आराधनाला बरं करायचं आहे. कारण तुझ्या बहीणीचा जिव आराधनात अटकला आहे आणि आई म्हणते की ति बरी होण्याची तुच एक आशा आहे." रविच्या रूम समोर पालकंड मारून बसत,"तु जोपर्यंत सोबत चालणार नाही, मि इथून हलणार नाही."
"जसं तुला हवं तसं कर." म्हणत त्यानं रूमचं दार लावलं. परत एक सिगरेट जाळली आणि तोंडात धरून विचार करु लागला,
ही 16-17 वर्षाची इवलीशी दिसणारी पोर कशाला त्याच्या मागे लागली आणि त्याचा आराधनाला ठीक करण्याशी काय संबंध? नक्की राधाच्या डोक्यात काय शिजतंय? आणि आराधना ती तर त्याचं डोकं खान्याशिवाय इतर काहीच करत नव्हती. आराधनाचा विचार करतांना ते किशोर वयातले दिवस आठवून तो स्वतःशीच हसला. लगेच सिरीयसही झाला, "असं काय झालं होतं तिच्या सोबत कि तिला पार वेड लागलं? एकदा बोलायचं तर होतं माझ्याशी. ज्या कोणावर प्रेम करत होती त्याला कान धरून तिच्यासमोर उभं केलं असतं.(अरु बद्दल अफवा उडली होती कि तिला आवडणारा मुलगा मिळाला नाही म्हणून ति पागल झाली.) पण तिनं तर मला काही सांगण्याच्या लायकीचंही समजलं नाही. समजणार तरी कशाला? होतं काय माझ्याजवळ? ती कुठे आणि मी कुठे? ती सुखवस्तू घरातली, शाळा कॉलेज टॉपर मुलगी अन मी साधारण घरातला, नोकरी करत कसातरी बी टेक डिग्री पूर्ण केलेला. मेळच नव्हता आमचा म्हणून तर आराधना आवडत असूनही तिलाच काय पण स्वतःच्या बहिणीलाही कधीच कळू नाही दिल्या माझ्या भावना."

रात्र झाली तेव्हा रवीला फुलराणीची आठवण आली. त्यानं दार उघडून बघितलं. फुलराणी सगळं शरीर एकवटून तिथंच मोबाईलमधे डोकं खुपसून बसलेली आहे हे पाहून रविला एकदा राधाला भेटन्यातच भलाई वाटली.

"उद्या जाउ पुण्याला." फुलराणीला आत घेऊन रविने तिला सांगितलं.

''नागपुर ....''

''का ?''

''कारण आराधना नागपुरला असायलम मधे आहे.''

''ओके !''

पहाटेच फ्लाइटने दोघेही आधी दिल्लीला गेले मग दिल्लीवरून नागपुरला रवाना झाले. राधा आणि डॉ पूर्वा आधीच नागपुरला हजर होत्या. असायलमच्या डॉक्टर सोबत बोलुन आराधनाला घरी घेऊन जायची तयारी सुरू होती.

''राधा मला का ओढ़तेय या सर्वात ? मी खुश आहे.''

''खरंच ! मला तर नुकतेच कळले कि निधी ही तुझी पहिली निवड नव्हती. तुझी पहिली निवड आराधना होती."
"......." रवीला शॉक बसला, "असलं काहीच नव्हतं. निधीनं मला त्रास व्हावा म्हणून हे खोटं सांगितलं तुला."
"पण मी तर म्हटलंच नाही कि हे निधीनं सांगितलं म्हणून, " थोडा विचार करून राधाने डॉक्टर पूर्वाच्या निष्कर्षाबद्दल सांगितलं.
"खरंच नसेल अरुबाबत काही तूझ्या मनात तर नसू दे पण तिच्या भल्यासाठी राहा काही दिवस आमच्यासोबत.''

''तू आणि अरू ... नाटक नाही करत आहेस ना ? आधी जशी ती गणित न समजल्याचा आव आणून एकच गणित माझ्या कडून १० वेळा करवून घ्यायची.''

''नाही रे ...आता तुला कसे सांगू ?''

''काहीच नाही,'' फुलरानीकड़े पाहून,''आणि परत हे असे खुळ माझ्याकड़े पाठवु नको.''

रवि तिथुन जाणार तोच एक नर्स आणि आया अरुला बाहेर घेऊन आल्या. त्याने नखशिकांत तिला न्याहळले. माझी पार रया गेलेली पाहून त्याचा चेहरा गरगर उतरला. अवखळ, उनाड, सदानकदा मस्ती मुड असलेली सोडष वर्षीय त्याच्या आठवणींच्या कप्प्यातली ती आणि वर्तमानातली डिप्रेशन मोड मधे गेलेली ती!

"अरुला पाहून तुला वाटतं का की आम्ही नाटक करतोय म्हणून?" राधाने रविला विचारलं. तो गप्प होता."हे बघ फक्त थोडीच मदत कर. मी जास्त दिवस नाही घेणार तुझे. पण अरू बरी झाली तर तुलाही काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळेल."

"आणि नाटक करतांना मी तिच्या प्रेमात अडकलो तर?  आता परत नाही सांभाळू शकेल मी स्वतःला." तो स्वतःशीच पुट्पुटला.
................
नर्स अरुला घेऊन गाडीच्या दाराजवळ गेली. पण अरु तिथंच थबकली. आत बसत नव्हती. राधा तिचा हात हातात घेऊन म्हणाली, "अरु बस गाडीत. आपल्याला घरी जायचं आहे.''
"घरी? कोणाच्या घरी?  माझं कोणतंच, कुठेच घर नाही." इतकं बोलून अरुने राधाला जोरात धक्का दिला आणि ती धावतच असायलमच्या आत गेली. खाली पडलेल्या राधाला पूर्वा आणि रवीनं उभं केलं.
"तु ठीक आहेस ना?"
"हो मी ठीक आहे. पण तु बघितलं ना कसं ढकललं तिनं मला. असं कसं होईल आपलं प्लान सक्सेस?"
"तिला थोडा वेळ द्या. 21 वर्षांपासून ती इथं आहे." असायलमच्या साठी पार वय असलेल्या सायकिऍट्रिस्ट लीला म्हणाल्या," त्यात मी आधीच सांगितलं होतं, तिची बरी व्हायची अजिबात इच्छा नाही."
"मी प्रयत्न करतो." रवी बोलला. राधाने त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं तरी डॉक्टर पूर्वा गालातल्या गालात गोड हसली. फुलराणी सगळं नोट करण्यात बीजी होती.
रवी सायकियाट्रिस्ट लीला सोबत असायलमच्या आत गेला. अरु तिच्या रूममधे बेडखाली लपून बसली होती. रूमच्या आत जाताच रवीची नजर भिंतीवर वेगवेगळ्या डिजाईनमधे काढलेल्या R वर पडली.
"हे आर माझ्यासाठी आहेत का?" नकळत त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला.
"अरु बेडखालून बाहेर ये बघू. तुला चॉकलेट मिळतील." लीला जेव्हापन अरुला तपासायला येई. ती अशीच बेडखाली लपत असे. त्यांना तिची सवय पाठांतर झाली होती. मग त्या तिला चॉकलेटचे आमिष दाखवायच्या आणि अरु बाहेर येई. म्हटल्याप्रमाणे त्या तिला एक डेरीमिल्क चॉकलेट देत. पण आज अरु चॉकलेटचे आमिष देऊनही बाहेर आली नाही.

"अरु बाहेर ये.'' रवी बेडजवळ जाऊन वाकून तिला म्हणाला, "तो गणिताचा एक फॉर्म्युला शिकायचा राहिला आपला. आठवतं...? "
गणित फॉर्म्युला.. कोण असेल हा. रवीचा आवाज तिला ओळखीचा वाटला. पण कोणाचा आवाज ते आठवेना. पूर्व  आयुष्यातल्या जवळ जवळ सर्वच माणसांचा विसर पडला होता तिला. रवीला पाहण्यासाठी ती बाहेर आली. रवी अजूनही जसाच्या तसाच दिसत होता. फक्त कानावरचे केस पिकायला सुरवात झाली होती.
"रवी..." अरुनं एक नजर भिंतीवरच्या R वर टाकली. मग परत त्याला पाहिलं आणि ती नाचत, उड्या मारत,  जोर जोरात ओरडू लागली,  "रवी रवी... रवी आला... माझा मित्र आला... रवी."
एकदम 21 वर्षांनी रवीला पाहून अरुला मॅनियाचा अटॅक आला होता.

क्रमश:

फोटो साभार गौरी वानखेडे (actress & model)

@अर्चना सोनाग्रे वसतकार
धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...