स्वीकार भाग 2 इथे वाचा
स्वीकार भाग 4 वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रविला अरूबद्दल काय वाटायचे.'' डॉ पूर्वाने राधाला विचारले.
''एका मित्राला आपल्या मैत्रीनीबद्दल जे वाटते तेच दादाला अरूबद्दल वाटायचे. अरूला तिच्या लग्नात स्वलिखित गणिताच्या पुस्तकाची पहिली प्रत देईल म्हणे. नाहीतर लग्न झाल्यावर मुलांना घेऊन यायची माझ्याकडे. पण ते झालेच नाही. अमृताला असायलममधे दाखल केल्याचे ऐकुन हळहळला होता तो.'' शून्यात कुठेतरी तिची नजर हरवली होती. कदाचित भूतकाळात जाऊन तेव्हाचे रवीचे हावभाव आठवत होती ती.
''आता काय चाललेय त्याचे?''
''आता काय चाललेय त्याचे ????'' डॉ पूर्वाचा प्रश्न रिपिट करत खिड़कीजवळ उभी राहून तोंडावर हात ठेउन, ओठ दाबत उत्तरली,''मला नाही माहीत, आता त्याचे काय चालु आहे ते.''
''आणखी एक मिस्ट्री ??'' डॉ. पूर्वा स्वताशीच बड़बडली.
''आयुष्यात इतके असाहाय्य कधीच वाटले नाही बघा. जीवलग मैत्रीनीचे मन समजले नाही आणि सख्खा भाऊ मागिल ७-८ वर्षा पासून कुठे, कसा आहे काहीच माहीत नाही. '' गालावरुन ओघळनारे अश्रु पुसत,''पण तो जीवंत असण्याच्या खाना खुना मीळत राहतात फेसबूक, इंस्तावर. तेवढ्यानेच तो जिथे आहे तिथे सुखरूप आहे असे मानुन समाधानी होते."
''बायको आणि मुलं?''
"मुलं झाली नाहीत, वाद वाढतच गेले, शेवटी ८ वर्षांआधी त्यांनी विचार विनिमय करून घटस्फोट घेतला. तेव्हापासून एका जिप्सीचे जिवन जगतोय तो. आम्ही प्रयत्न केला त्याच्याशी बोलण्याचा. पण तो कशालाच प्रतिसाद देत नाही. त्याला वाटतं आम्ही सहनाभूति दाखवतोय. म्हणून टाळतो आम्हाला. सतत धावत असतो. इथुन तिथे, तिथुन परत कुठेतरी. ८ वर्ष झाली स्थैर्य नाही त्याला.''
''म्हणजे होप आहे राधा.''डॉ पूर्वाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
''कशाची ?''
''आराधना आणि रविच्या विस्कटलेल्या आयुष्याला स्थैर्य लाभायची !''
''ते कसे ?''
''आधी आपण आराधनाला घरी घेऊन येउ. ती घरच्या वातावरनात आपल्यासोबत राहील, २४ तास मी तिला ऑब्जर्व करेल. होउ शकते की प्रेम, आपलेपना, योग्य आहार विहार आणि औषधिच्या मदतीने तिचे मानसिक संतुलन लवकरच जागेवर येईल.''
''तिला हॅंडल करणे सोपे नाही.''
''I know that. पण रवि सोबत असला तर सर्वच सोपे होईल.''
''तो भेटेल तेव्हा ना ....''
''त्याची काळजी तु करू नकोस. फुलरानी बोलेल त्याच्याशी. लोकांना पटवण्याच्या कलेत माहिर आहे ती.''
''हो ह्या बाबतीत मला अजिबात शंका नाही.'' अमन सोबत लग्न करण्यासाठी फुलरानीने तिला कसे पटवले ते आठवून,''अनुभव आहे मला.'' दोघी एकमेकींकड़े पाहून मिश्किलपने हसल्या.
"रवीआधी त्याची बायको निधी सोबतही बोलावं लागेल आपल्याला."
"कशाला?"
"आराधनाला पटवून द्यायला कि रवी खरंच एकटा आहे."
"बरोबर. कारण त्याचा संसार विस्कटू नये म्हणून हिने सगळं मनातच दडवून ठेवलं. तेव्हा निधीला भेटू आपण आणि सांगू सगळं."
"ती समजून घेईल?"
"नक्कीच, रवीपेक्षा जास्त समजूतदार आहे ती. घटस्फोट झाल्यावर अरेंज मॅरीएज केलं आणि एका 8 वर्षाच्या मुलाला दत्तक घेऊन इथे पुण्यालाच आनंदात संसार करतेय ती."
"छान !"
एक एक कप कॉफी घेऊन त्या दोघी रिलॅक्स झाल्या.
''खूप हलक वाटतेय आज.'' पूर्वाचा हात हातात घेऊन,''आमच्यासाठी तुझी सगळी कामं सोडून दिल्ली वरून इथे आल्याबद्दल धन्यवाद पूर्वा !''
''अरे इट्स ओके डियर ! मी तर माझ्या पागल पोरीसाठी इथे आली. म्हटलं ह्या केसच्या निमित्ताने का होइना तिच्या होणारया सासुची भेट होईल आणि कधीही न पहिलेला आपल्याच देशाचा भाग पन पाहिल्या जाईल.''
''ओहो रियली,'' पूर्वाने होकारार्थी मान हलवली म्हणून राधाने विचारले ,''मग कशी वाटली सासु ?''
''उम्म ....... '' इकडे तिकडे पाहत पूर्वा,''छान वाटली ग आणि सासु पेक्षा मैत्रीणच जास्त वाटली.'' घड्याळाकड़े पाहून,''सहा वाजत आहेत. मी निघते आता. बघते जरा तुमचे पुणे कसे आहे ते? आणि माझ्या पोरीला पण कामाला लावते रवीचा शोध घ्यायला."
....................
राधा आणि डॉक्टर पूर्वा निधीला भेटायला तिच्या घरी गेल्या. तिनं त्यांचं स्वागत केलं. जास्त आढेवेढे न घेता राधाने विषयालाच हात घातला.
"माझ्या बोलण्याने रवीचं भलं होईल तर मी नक्कीच भेटेल आराधनाला आणि तुम्ही म्हटलं तसंच सांगेल तिला. मला वाटलं होतं आमचा घटस्फोट झाल्यावर तो स्थिरावेल. पण तो अजूनच विस्कटला. खरं सांगू का त्याला मी प्रपोज केलं होतं लग्नासाठी. तेव्हा तो मला म्हणाला होता कि, 'तु माझी पहिली निवड नाहीस. पण ती माझ्या अवाक्याबाहेर आहे.' म्हणजे मी भेटायच्या आधी त्याला नक्कीच कोणीतरी आवडत होतं."
"काय?" राधाला शॉक बसला.
"म्हणजे रवीलाही आराधना आवडायची कि काय?"डॉक्टर पूर्वाने तिची शंका बोलून दाखवली.
"माहित नाही पण आमच्यासोबत कॉलेजमधे ती मुलगी नव्हती हे नक्की."
"देव आपली ही काय परीक्षा पाहतोय."
"लवकरात लवकर रवी भेटो. तोच हे गूढ उलगडणार आता."
क्रमश:
फोटो साभार गौरी वानखडे (actress & model)
अशाच छान कथा, लेख वाचण्यासाठी माझा ब्लॉग फॉलो करा.
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
No comments:
Post a Comment