Saturday, 23 May 2020

LOVE, REVENGE & RELATIONSHIP 1 the questions

Love, revenge & relationship 
Part - 1
The questions 


Ram :- I never thought that one day I will love a girl whom I was used to call a stupid. Who was my sisters best friend and stayed at our home for every weekend, don't know for what purpose. Because most of the time I saw them only doing chit chat & watching TV or eating delicious food made by my dear mom rather than doing study. I never notice anything attractive in her. And now I have become crazy for her. Feeling a gravity force which is dragging me to her. I have stuck to her. It seems impossible to separate from her. Because now I got that she is too good at heart, lovely & innocent. But too calm. Don't know why I am feeling so much change in her behaviour. No liveliness, no wildness as before. Just a living flesh. I want to know the reason behind this change. But from whom? She doesn't speak a word. I am feeling helpless. Is she cares about it? 

Aarchee :- Yes! its been 2 month that I am living with Ram and never said a word. Even better that I have become dumb and duff after loosing my family and friendship. Which was my world in good time as well as in bad time and now no one is with me. So there is nothing to say or share with Ram. Everything is plain. No present no future. What I tell him? from where I should start? How I show him the hell of my life? Sometimes I feel that I am getting hallucinations. I have became mentally ill. There is nothing remained in life to live for. My parents are suffering their life because of me & I am here living with ram a comfortable life. I am so much selfish, a coward. A dull girl. Only these things about me I can tell Ram. Will he understand it? 

Ram :- I want Aarchee in my future as my companion for life time. After all there is no difference in our relation and an husband wife's relation. One can say that we are live in relationship. Though both of us never mention that because we are just living  with each other without any hope. Except one hope from my side , that Archee will accept my marriage proposal. Is she will accept? Okay If she accepts my proposal what I will tell my parents? How Meera will react? & Shrutee? I have forgotten her. Is she will forgive me? After all I am her fiancé. Just 3 months before our engagement ceremony has happened with huge celebration. & now I want to break it for the sake of Archee.🙇 Is she understand this? 

Aarchee :- Marriage ! Every parent has a dream to see their children happily married. My parents had one and so they choose Jivan for me. Calm, good looking, simple with good earning more than enough for family requirement. There was no chance to say no to him. Though my first choice was Ram but he was just a dream for me. Getting married with Ram is impossible for me. Because his own sister and my best friend , Meera has told me that Ram will never accept me as his life partner. As there were so many differences among us. She was right somewhere, because we were really different.

He was calm and I was loud,
He was so studious and I was far from study,
He used to play with machines and I used to play with words.
He was a kingfisher and I was songbird.
More on , 
He was stable as sea and I was a moving river.

But then why we mate & hooked up with eachother?

May be 
We mate because, after all, river moves to meet the sea
& in the end she (river ) meets the sea !
Is it really? 
There are lots of questions & very few answers. 

Continue.... 
©®Archana Sonagre Wasatkar
All rights reserves to writer. Please don't publish any part of the story anywhere. 
Thankyou 😇

Note-Photo from google with regards. 

My book - LOVE, REVENGE & RELATIONSHIP

to read part 1of love revenge & relationship click here

Hi friends. I am Archana. Before 6-7 years there were lots of stories born in my mind to write novel. One of them is 'LOVE, REVENGE & RELATIONSHIP'. I wrote  20 parts of it on my blog miarchanasonagre.blogspot.com Then I got busy with some other things like job, family & couldn't write further story. In lockdown time I read those 20 parts & found the story beautiful. So I have decided to write the story / novel again with proper ending.😊  

The story is about a 24yr old young wonderful, wild & lovely girl. Who is engaged with a charming 27yr old guy. Soon they are going to marry. But before the wedding ceremony take places some unbelievable incident happened & the young women's life turns to an unpleasant dream. She losses everything....... & live a life of trash. Why, what & how?

 To know the answer's please stay tune with me. Follow me. 😇
Hope you will enjoy reading this novel. You Will understand how destiny ruined our life to fulfill our dreams. Falling love with the main lead Archee & Ram. & hate the villain too. Also if you like the story please do like & share it with your friends.


Wednesday, 20 May 2020

एवढंसं पिलू माझं





एवढंसं पिलू माझं 

टुणूक टुणूक शाळेत जातं. 

काय समजतं, काय उमजतं 

त्याचं त्याला माहित !

हिंदी मात्र खुप छान बोलतं, 

स्वतःशीच कधीतरी इंग्लिशही बडबडतं !

माझ्या कानाशी येऊन भिंगोट्यासारखं गुण गुण करतं !

सारं काही ठीक, 

पण पाठीवरचं ओझं पाहून काळीज धडधडतं. 

पोर तर अजून पाहिलीतच जातं, 

परीक्षेसाठी सारं घर डोक्यावर घेतं. 

इतकं तर आम्ही दहावीतही नाही शिकलं, 

जितकं इंग्लिश त्याचं आताच पाठांतर झालं. 

कळत नाही केव्हा पोर इतकं मोठं झालं? 

कवितेचे सर्व हक्क कवयित्रीकडे राखीव आहेत. परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित किंवा प्रस्तुत करु नये ही विनंती. 
धन्यवाद 
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Tuesday, 19 May 2020

स्वीकार भाग 13

स्वीकार भाग 12 इथे वाचा
डॉक्टर जयानं अरुला CBT थेरेपी देणं सुरु केलं. अरुनं पाचव्या महिन्यापासून बालाजी तांबे यांच्या 'गर्भसंस्कार' वर्गाला जाणं सुरु केलं. काही संस्कार वर्ग रवीनंही तिच्यासोबत अटेंड केले. ध्यान आणि गर्भवतीला फायदेशीर ठरतील अशी योगासनं डॉक्टरच्या सल्ल्यानं ती करु लागली. अमननं घर खेळण्यांनी भरून टाकलं. नवीन बेडशीट, परदे घरात आले. गोड गुबगुबीत बाळांचे फोटो आराधनाच्या खोलीत लावले गेले. सगळीकडे आनंदी आनंद झाला.
तिला एकच वाटे आपल्यामुळे यांना जास्त त्रास होऊ नये. पण नववा महिना सुरु झाला तेव्हापासून उठण्या बसण्यात तिला जास्तच त्रास होऊ लागला. झोपतांना तर बाळ छातीशी आल्याचा भास व्हायचा. मग झोप लागत नसे. श्वास घ्यायला त्रास होई. पायाच्या तळव्यांची आग होई. तिच्या मनात येई, 'स्वतःच पोट फाडून बाळाला बाहेर काढून टाकावं.' तिची चीडचीड वाढली. बाळंतपणाच्या आधी येणाऱ्या नैराश्यानं तिला ग्रासलं. अशावेळी आई तिच्या तळपायांना तूप लावून कास्याच्या वाटीनं घासे. तिला झोप लागावी म्हणून रवी  डोक्याची मालीश करे. ती झोपे पर्यंत तिच्या केसांमधून हात फिरवी. राधा चंदन सुगंध असलेली मेणबत्ती लावी. त्या मंद प्रकाशानं आणि सुगंधानं तिला बराच आराम मिळायचा. संगीत थेरेपीनंही तिला खूप बरं वाटे. ती हे सगळं डायरीत लिहून ठेवायची.
अशातही अरुचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. सोसायटीच्या बायांनी आपणहुन हजेरी लावली. नायक बाईनं अरुची ओटी भरली,
"जे झालं ते विसर बाई. अशीच निखळ अजून. काही लागलं सावरलं तर आम्ही आहोतच."
नववा महिना पूर्ण झाला त्या दिवशीच अरुचं सिझर करण्यात आलं. मुलगी झाली. अरु आणि रवी सारखीच गोंडस.
"अमन आणि अर्णवला बहीण आली गं अरु!" रियानं अरुला बाळ दाखवत सांगितलं. बाळाला पाहुन अरुच्या डोळ्यात पाणी आलं. आपण आयुष्यात कधी आईपनही जगू शकू असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनात काही ओळी तयार झाल्या,
थोडं हसायचं, थोडं रडायचं,
सर्वांना सोबत घेऊन चालायचं,
इच्छापूर्ती होईलच कधीतरी,
थोडया वेळानं झाली म्हणून,
वाईट न मानायचं,
आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकायचं !
अर्थातच रवी आणि घरच्या इतरांची खरी परीक्षा आता सुरु झाली. बाळंतपणानंतर अरुला नैराश्याचे झटके येऊ लागले. पण तिची आई, राधा आणि उषा काकू सगळ्याच परिस्थितीला तोंड द्यायला तयार होत्या. अरुच्या बाळंतपणाआधी डॉक्टर जयानं  तिघींचंही समुपदेशन केलं होतं. समुपदेशनची गरज रुग्णासोबत त्याच्या घरच्यांनाही असते. बाळ झाल्यावरही अरुची दिनचर्या तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न होऊ लागला. तिची झोप व्हावी म्हणून बाळाला रात्री अरुची आई जवळ घेऊन झोपत असे. वरचं दुध बाळाला देण्यात येई. ज्यामुळे अरुची छाती भरून येई. रोज सकाळ संध्याकाळी दुध पम्पनं काढून घ्यावं लागे. तेव्हा तिला खूप वाईट वाटे. पण ती स्वतःला समजवायची की हे बाळाच्या भल्यासाठी जरुरी कसे आहे.  पूर्ण झोप आणि इतर थेरेपीजनं अरुला बरं वाटे.
बाळ सव्वा महिन्याचं झाल्यावर 20-25 लोकांच्या उपस्थितीत नाव ठेवण्यात आलं. ईरा !
नाव ठेवल्यावर रिया लंडनला परत जाणार होती. पण महेशनं सांगितलं की तो नेहमीसाठी भारतात परतण्याचा विचार करतोय. बंगलोरला एका कंपनीनं त्याला छान जॉब ऑफर दिली आहे. सगळं सावरून यायला 1 महिना लागेल. तिला खूपच आनंद झाला. ती काही दिवसांसाठी माहेरी गेली.
पाहता पाहता सहा महिने लोटले. आपल्यामुळे राधाला प्रायव्हसीच मिळत नाही. हे ठीक नाही. म्हणून रवीनं त्याचा कात्रजचा फ्लॅट विकून राधाच्या शेजारचा फ्लॅट विकत घेतला. अरु घरात राहून बोर झाली आणि तास तास उदास बसू लागली. तिला असं पाहुन रवीनं तिला डॉक्टर जयाकडे नेलं.
"आराधना जॉब करायचा आहे?" डॉक्टर जयानं विचारलं.
"हो." तिचा चेहरा आनंदानं फुलला.
"माझी असिस्टंट म्हणून जॉब करशील?"
"मी आणि तुमची असिस्टंट?"
"हो तुझ्यात ते पोटेंशियल आहे गं."
"सॉरी डॉक्टर मधात बोलतोय. पण अरुला दगदग झेपेल का?"
"रवी बघ सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2 तास माझं हे  क्लिनिक उघडं असतं. बाकी वेळ मी दुसऱ्या क्लिनिकमधे असते. अरुचं काम फक्त जे कोणी रुग्ण येतील त्यांची पूर्ण हिस्ट्री घ्यायची आणि माझ्याकडे पाठवायचं इतकंच राहणार. तसंच यामुळे ती माझ्या निगराणीतही राहील."
"ठीक आहे मग."
अरु परत काम करायला लागली, तिचा वेळ छान जाऊ लागला. मनाचा आणखी सखोल अभ्यास करता यावा म्हणून अरुनं माणसशास्त्रात पदव्युत्तर पदवीला दाखला घेतला. ती फक्त प्रॅक्टिकल करायला कॉलेजला जायची. आत्मनिर्भर झाली आणि ईरालाही भरभरून प्रेम देऊ लागली.
समाप्त.
आशा करते वाचकांना माझी ही कथा कादंबरी नक्कीच आवडली असेल.
तशी ही कथा आराधना आणि रवीचं लग्न होतं तिथंच संपवणार होते. पण मला वाटलं की लग्न जुळतांना मोठा प्रश्न असतो तो, मुलीला बायपोलर असो किंवा शुगर बाळ होणार का? आणि झाल्यावरही ते निरोगी होणार की नाही? म्हणून हे दोन भाग लांबवले. बाकी बायपोलर बद्दलही माहिती हवी असेल तर तशी कमेंट करा. मी त्यावरही एक भाग लिहिल.
माझा काही खूप सखोल असा बायपोलरचा अभ्यास नाही. तरीही मी ही कथा कादंबरी फक्त आणि फक्त वाचकांनी मानसिक विकार असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवावा आणि कोणालाही असा काही त्रास असेल तर त्यानं सायकोलॉजिस्ट किंवा सायकिऍट्रिस्टची मदत घ्यावी या हेतूनं लिहिली आहे.
धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 12

स्वीकार भाग 11 इथे वाचा
रवीनं राधाला फोन करून अरूबद्दल सांगितलं. तिनं लगेच माधव सोसायटीच्या सिक्योरिटीला कॉल करून अरुबद्दल विचारलं.  तेव्हा कळलं की अरु बस स्टॉपवर गेली तर होती पण लगेच परत आली. राधाने रवीला घरी जायला सांगितलं आणि ती स्वतःही घरी गेली. रवीनं त्याच्याजवळच्या चाबीनं दार उघडलं. त्याला अरु हॉल मधेच सोफ्यावर झोपलेली दिसली.  तिचा पर्समधे असलेला मोबाईल वाजतच होता. त्यानं मोबाईल काढला. राधाचा कॉल होता. रवीनं तिला घरी नाही आली तरी चालेल सांगितलं. थोडयावेळात अरुला जाग आली.
"तु ठीक आहेस ना?" रवीनं तिला विचारलं.
"हो. म्हणजे नाही. मला दोन तीन दिवसांपासून काहीच करा नाही वाटत आहे बघ. फक्त झोपायची इच्छा होतेय."
"उदास वाटतेय का?"
"हो तसंच काही. हुरूप नाही वाटत कशाचाच."
"बरं मग सांगायचं तसं. चल आपण डॉक्टर जयाला भेटून येऊ."
"हो तेच ठीक राहणार."
डॉक्टर जया एक नामवंत सायकिएट्रिस्ट. पूर्वा अरुची केस त्यांनाच सोपवून दिल्लीला गेली होती.
"मला जरा वेगळीच शंका येतेय." डॉक्टर जया अरुला तपासून म्हणाल्या.
"कसली शंका."
"अरु प्रेग्नेंट असल्याची."
"काय." रवी खुर्चीतुन उठून उभा झाला,"अहो मी तेरा वर्ष वैवाहिक आयुष्य जगलो पण मला बाळ नाही झालं."
"म्हणजे तुम्हाला अरुवर संशय आहे."
"नाही मुळीच नाही. पण म्हणून मी अरुसोबत लग्न झाल्यावर या गोष्टीचा विचारच नाही केला इतकंच सांगायचं आहे."
"तुम्ही टेस्ट नव्हत्या केल्या का मग तुम्ही आणि तुमच्या पहिल्या बायकोने?"
"नाही आम्हाला कमी कोणात आहे हे माहित करून कोणालाच हिणवायचं नव्हतं."
"बरं मग तुमच्या पहिल्या बायकोला मुल झालं का दुसऱ्या लग्नानंतर?"
"नाही, तिनं एक मुलगी दत्तक घेतली."
"ओके ! मी नर्ससोबत अरुला पाठवलं आहे युरीन टेस्ट साठी."
"पण डॉक्टर या वयात आणि अशा मानसिक स्थितीत बाळ... "
"मलाही तोच प्रश्न पडला आहे." अरु नर्ससोबत आत येऊन म्हणाली, "टेस्ट पॉझिटिव्ह आहे."
"डॉक्टर हेमा बिनीवाले, ही माझी मैत्रीण आणि चांगली गायनॅक आहे. तिला भेटा. तूझ्या सगळ्या तपासण्या करेल ती आणि बोलेल माझ्याशी. पण महत्वाचे हे आहे की तुमच्या दोघांना बाळ हवं आहे की नाही?"
दोघांनी एकमेकांकडे बघितलं.
"घाई नाही. आरामात घरी जाऊन बोला आणि ठरवा. कारण खरी परीक्षा बाळ झाल्यावर राहील. बाळ झाल्यावर अरुला सतत कोणीतरी मायेचं, तिची आपणहुन काळजी घेणारं सोबत लागेल. ज्याला तिच्या मानसिक परिस्थितीची पूर्ण जाणीव असेल. बाकी मूड डायरी तर तुम्ही ठेवलीय ते छान."
...............
अरुला घेऊन रवी डॉक्टर हेमाकडे गेला. डॉक्टर हेमाने तिच्या सर्व टेस्ट केल्या. सोनोग्राफी केली.
"सोनोग्राफीत बाळाची वाढ योग्य दिसते. बाकी ब्लड रिपोर्ट उद्या मिळतील. ज्यानं आपल्याला आराधनाचं हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि शुगर कळेल. रिपोर्ट आले की मी बोलते जयासोबत." डॉक्टर हेमा म्हणाली.
रात्री दोघही घरी आले. दोघेही गप्प होते. राधाला वाटलं यांचं काहीतरी बिनसलं वाटतं. ती गरम गरम कांदे भजे घेऊन त्यांच्याजवळ गेली.
"घ्या गरम गरम भजे खा. नाहीतर अतुल एकटा संपवायचा सगळे."
"हो ते मी करु शकतो."
अरुला भज्यांचा तळणाचा वास सहन नाही झाला. तिनं  नाक दाबून घेतलं.
"अगं काय हे?  भजी तर आवडती आहेत ना तुझी?"
"हो पण मला आता मळमळ होतेय त्यांच्या वासानं."
"काय? राधाला अमनच्यावेळी असं व्हायचं. काय रे रवी काही गोड बातमी आहे की काय?"
"अतुल काहीही."
"अतुल बरोबर बोलला." रवी म्हणाला. त्यानी डॉक्टर जयानं बोललेलं सगळं राधा आणि अतुलला सांगितलं.
"मग काय ठरवलं तुम्ही?" राधानं त्याला विचारलं, "मी आहे ना जातीनं सगळं करणार अरुचं. तुम्ही दोघं फक्त हो म्हणा."
"खूप भीती वाटते गं राधा मेनोपॉज यायच्या वयात हे बाळंतपन!"
"असं समज तुला वयाचं 48 वं नाहीतर 28 वं वर्ष सुरु आहे. म्हणजे भीती वाटणार नाही."
"काहीही राधा."
"अगं खरंच. चल तूझ्या आईला ही गोड बातमी सांगू." राधानं फोन हातात घेतला.
"राधा अजून रिपोर्ट नाही आलेत. ते आल्यावर सांग  त्यांना."
"ते काहीच नाही. त्यांचा हक्क आहे हे सगळं माहित असण्याचा."
राधानं महेशला व्हिडीओ कॉल लावला. अरुची बातमी सांगितली. त्यांना खूप आनंद झाला.
"अरु आनंदी दिसत नाही." रियानं तिचा चेहरा वाचला. तेव्हा राधानी इतर गोष्टींची कल्पना त्यांना दिली. बाळ झाल्यावर अरुला पोस्टपार्टमचा (मातृत्वानंतर येणारे नैराश्य) त्रास होऊन तिची मानसिक परिस्थिती बिघडू शकते. तेव्हा अरुजवळ 24 तास कोणीतरी लागेल आणि बाळाला पाहायला एकजण वेगळं लागेल.
"इतकंच ना! मी पुढल्याच महिन्यात येते तिकडे. तु काळजी करु नकोस. आपण मिळून करु सगळं." अरुची आई म्हणाली.
"हो, आम्ही आईला पाठवतो तिकडे आणि बाळ झाल्यावर मी येते 2 महिने नक्कीच राहीन माझ्या नणंदबाईसाठी."
"का इतका त्रास घेताय तुम्ही सर्व." अरु चिडक्या स्वरात म्हणाली. तिचा मूड बदलतोय हे पाहुन रवीनं तिची मूड डायरी तिच्या हातात दिली. अरुला डायरी पाहताच लक्षात आलं आपला मूड बदलतोय. ती शांत झाली.
"काही त्रास वगैरे नाही अरु. तूझ्या हिश्याचंच तुला देत आहोत."
"मग ठरलं आपल्या घरी लवकरच पाळणा हलेल." अतुल म्हणाला, " तोंड गोड करायला हवं होणाऱ्या आई बाबाचं. मी काहीतरी गोड घेऊन येतो."
अरुचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले. अरुला इतर काही त्रासही नव्हता. अरु आणि रवीनं डॉक्टर जयाला ते बाळाला जन्म देणार हा निर्णय सांगितला. त्यांनी दोघांचं अभिनंदन केलं. डॉक्टर हेमासोबत बोलून त्या म्हणाल्या,
"अरु तुझं शारीरिक आरोग्य उत्तम आहे. तरीही बाळंतपण इतकं सोपं होणार नाही. पण जवळ जवळ सगळ्याच मातांना बाळ झाल्यावर नैराश्याला समोर जावं लागतं. तुझी काही औषधं कमी करते, काही बदलते पण औषधं घ्यावीच लागतील. म्हणून बाळाला तुझं दूध पाजता येणार नाही. म्हणजे वरचं दूध देऊ. आता इतकंच. बाकी दर महिन्याला आणि जेव्हाही काही त्रास वाटला फोन करून ये."
"एक शंका आहे."
"बिनधास्त बोल गं."
"माझा हा विकार अनुवांशिक रित्या बाळाला होऊ नये यासाठी काही करता येईल का?"
"खूप महत्वाचा प्रश्न विचारला तु. असं आहे बघ याबाबत मी सुद्धा काहीच कन्फर्मेशन नाही देऊ शकत. कारण खूपदा असं दिसून येतं की आईबाबांची बायपोलरची हिस्ट्री असूनही मुलांना तसला काहीच त्रास नसतो. आणि एकदम सामान्य पारिवारिक इतिहास असूनही काहींना गंभीर मानसिक आजार होतात. त्यातही बाळ पोटात असतांना तुझं मानसिक आरोग्य कसं आहे? त्या गर्भावर तु काय संस्कार करतेस यावर सगळं अवलंबून आहे."
"असं असेल तर मी माझी उत्तम काळजी घेईल."
"घ्यायलाच हवी. काय रवी!"
"हो आम्ही अरुसाठी पूर्ण दिवसाचं वेळापत्रक परत तयार करतोय." रवीनं दाखवलं नाही पण मनातून त्याला अरुची खूप चिंता वाटत होती.
"गूड! पण तिची काळजी घेतांना स्वतःला विसरू नकोस.'' डॉक्टर जया त्याचे भाव टिपून म्हणाली.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 11

स्वीकार भाग 10 इथे वाचा
अरु रोज रवीसोबत पराठा शॉप मधे सकाळी 8 वाजता जाऊ लागली. दोन कुक आणि दोन वेटर असा स्टाफ होता. रवी मार्केटिंग सांभाळायचा आणि अरु कस्टमरला. तिचं लाघवी बोलणं, हसून ऑर्डर घेणं आणि विचारपुस करणं तिथं येणाऱ्यांना भावून जायचं.
एकदा एक पन्नाशीतील स्त्री तिच्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन शॉपमधे आली.
अरुनं त्याला हाय केलं आणि काय खाणार ते विचारलं.
"नमस्कार, पोहा पाहिजे." तो म्हणाला.
"मॅम तुम्ही?"
"मला आलू पराठा."
"ओके."
अरुनं कुकला आलू पराठा आणि पोहा बनवायला सांगितलं. "किती वेळ लागेल?"
"पाच मिनिट फक्त."
"अच्छा. तुम्ही नवीन ना इथे?"
"हो."
"आधी कुठे होतात? आणि हे (रवीकडे बोट दाखवून) तुमचे मिस्टर का?"
"आमचं लग्न होणार आहे. ते आधी लद्दाखला नोकरी करायचे आणि मी नागपूरला असायलम मधे होती. आता 3-4 महिने झाले मला तिथून निघून."
"काय? एक वेडी बाई इथे काम करतेय?" तिनं नातवाला तिच्याजवळ घेतलं जसं काही अरुला काहीतरी संसर्ग झाला अशी ती 2 हात दूर गेली अरुपासून, "तुमचं हे शॉप बंद व्हायला हवं. आमच्या मुलांवर काय संस्कार होतील अशाने?"
काय झालं हे पाहायला रवी त्यांच्याजवळ आला. त्याच्या मनात आलं त्या बाईला खूप खरी खोटी ऐकवावं. पण अरुनं त्याला थांबवलं.
"अरु !"
"असू दे. हे होणारच होतं. हेच मला तुला दाखवायचं होतं. माझा सामान्य म्हणून स्वीकार नाही करणार हा समाज. याची झळ तुला बसेल. जे मला नकोय."
"आम्ही बोलू काही." एक सत्तरीच्या आसपास असलेलं जोडपं उठून त्यांच्याजवळ आलं.
"हा काही हवं का? सॉरी आम्ही आमच्याच गोष्टीत बिझी झालो होतो."
"असू द्या. आम्ही ऐकलं सगळं. त्याबद्दलच मला तुम्हाला काही सुचवायचं आहे." जोडप्यातील काकू प्रसन्न हसून म्हणाल्या.
"काय?"
"तु कर्वे शिक्षण संस्थेत सहा महिने किंवा एक वर्षाचा  समुपदेशनाचा कौन्सिलिंग इन मेंटल हेल्थ कोर्स कर. तुला स्वतःला आणखी चांगल्यानं जाणून घेता येईल. तसेच इतर जे रिहॅब सेंटर आहेत त्यांच्या भेटी घे. तिथल्या पेशंटचे व्यक्तीमत्व विकासाचे वर्ग घे. स्वतःच्या अनुभवांची खान उघडी कर त्यांच्यासमोर. होऊ शकतं तुझ्यापासून प्रेरणा घेऊन काही मानसिक रुग्ण त्यांच्या कोशातुन बाहेर पडायचा प्रयत्न करतील."
"अगं बस. तिला तु काय बोलतेय ते समजू तर दे."
"मला फक्त इतकंच सांगायचं आहे की अशी लोकं तुला पदोपदी भेटतिल तेव्हा स्वतःच मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नकोस."
"हो नक्कीच."
"आणि मला तुमची ती कोर्स जॉईन करायची आयडिया आवडली. मी आजच जाऊन माहिती काढतो."
या प्रसंगानं अरुच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं. कोर्स जॉईन केल्यावर ती (मानसिक स्वास्थ्य)मेंटल हेल्थ विषयी जागृती अभियान चालवणाऱ्या काही संस्थांसोबत जुळली.  ती आणखी व्यस्त झाली. कोण काय म्हणतं? का म्हणतं? याकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळत नव्हता. रिहॅब सेंटरमधे ती वर्ग घेऊन यायची तेव्हा तिच्याजवळ इतक्या गोष्टी असायच्या सांगायला आणि अर्थातच ऐकायला रवी सज्जच असायचा. तो तिची खूप काळजी घ्यायचा. सकाळी ती कॉलेजला जायची तेव्हा तिचा टिफिन पॅक करून देणं,  देण्यापासून ति दुपारी पराठा शॉपमधे परतली की तिला आधी जेवण वाढून देणं. रिहॅब सेंटरला वर्गासाठी घेऊन जाणं. परत आणणं. सगळं तो मनापासून करत होता. पावसाळा सुरु झाला.
"आज मी कॉलेजला जाणार नाही आणि तु शॉपमधे." खिडकीबाहेर बघत अरु म्हणाली.
"काय विचार काय आहे मॅडमचा?"
"बाहेर बघ ना किती मस्त वातावरण झालंय पावसानं. आपण चौघ खडकवासला जाऊ."
"तुम्ही दोघ जा. आम्ही नोकरदार. सुट्टी नाही मिळायची आम्हाला."
"हे तुमचं नेहमीचच." अरुनं जीभ चावली.
"असं?" राधानं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
"सॉरी."
"अगं जा तुम्ही दोघं."राधा तिला लाडात म्हणाली.
मग अरुनं कॉलेजच्या सरांना, तिचं आज यायला जमणार नाही असा मेसेज केला आणि रवीनं पराठा शॉपमधे कळवलं तो उशिरा येईल ते. ते दोघंच बाईकनं निघाले खडकवासल्याला अन जाता जाता सिंहगडवर जाऊन पोहाचलें. अरुला उंचीची भीती वाटत होती. तिनं डोळे घट्ट मिटले आणि रवीला दोन्ही हातांनी पक्क पकडलं.
"मॅडम डोळे उघडा आणि सोडा आम्हांला. आपण आलो गडावर."
"अरे हो. किती सुंदर दिसतंय ना सगळं पावसानं न्हाऊन निघाल्यावर."
"हो."
थोडावेळ फिरल्यावर दोघं एका ठिकाणी चहा प्यायला बसले. अरु मंद मंद स्मित करत रवीला पाहु लागली.
"काय झालं."
"उंहू, झालं नाही होतंय."
"म्हणजे, तब्येत ठीक नाही वाटत का? परत जायचं का आपण?"
"नाही रे." त्याचा हात पकडून ती म्हणाली, "तुला किस करायची इच्छा होतेय.''
"माझी मस्करी करतेयस तु."
"अजिबात नाही. महाराजांच्या गडावर आहेस म्हणून वाचला तु."
"काय?"त्याचा चेहरा अगदी गोरा मोरा झाला.
"आपण उद्याच लग्न करूया."
"ए बस. हार्ट अटॅक येईल मला. पन्नासावा वाढदिवस आहे पुढल्या महिन्यात माझा."
"नाही खरंच आपण उद्या लग्न करु. मी आता मानसिक रित्या त्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे."
राधा आणि अतुलने त्यांचं आदर्श पद्धतीने मंदिरात लग्न लावून दिलं. व्हाट्सअप व्हिडीओ कॉल वरून अरुच्या आईबाबा, महेश, रियानं त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
त्यांचं वैवाहिक जीवन सुरु झालं. कधीकधी अरुला मूडस्विंगचा त्रास व्हायचा. पण आता तिला आणि रवीला हे होईलच आणि तेवढा वेळ गेला की मूडही ठीक होईल हे कळायचं. म्हणून ते फक्त असं झालं की वहीत नोंद करून ठेवायचे. म्हणजे सायकिऍट्रिस्टला भेटायला गेलं की हा डाटा दाखवून त्यानुसार ती ट्रीटमेंट देई. अरुचा समुपदेशनचा अभ्यास वर्ग पूर्ण झाला. परीक्षा झाली. ती चांगल्या मार्कात पास झाली. एका नावाजलेल्या रिहॅब सेंटर मधे अरुनं शिकाऊ समुपदेशक म्हणून काम करणं सुरु केलं. तिकडे रवीचं पराठा शॉपचा चांगला जम बसला. सकाळी 7 ते 9 आणि दुपारी ऑफिसचे लंच ब्रेक झाले की त्याला बसायचीही उसंत मिळत नव्हती. त्याची दगदग पाहुन आता पुढे आपणच आपली जबाबदारी घ्यायचं तिनं ठरवलं.
"यापुढे कुठेही मी एकटीच जात जाईल. तुम्ही आपापली कामं सोडून माझ्या मागे धावायची गरज नाही. जिथं जाईल तिथं जायच्या आधी आणि पोहोचल्यावर तुम्हाला मेसेज करत जाईल." राधा, अतुल आणि रवीला तिनं तिचा निर्णय सांगितला.
"अगं पण... " राधा म्हणाली.
"प्लीज... "
"मला अरुचा निर्णय पटतोय." अतुल म्हणाला.
"मी पण तिच्याशी सहमत आहे."रवी म्हणाला. आणि अरुचं आत्मनिर्भर आयुष्य सुरु झालं. रवीनंही खबरदारी म्हणून अरु समुपदेशन करायला जात असलेल्या रिहॅब सेंटरच्या ऍडमिनला अरु तिथं गेल्यावर आणि तिथून निघाल्यावर कॉल किंवा मेसेज करायला सांगितलं.
"हॅल्लो, आज अरु समुपदेशन करायला सेंटरवर आली नाही. मी कॉल केला तर ती उचलत नाहीये."
"काय?"
"हो, म्हणूनच तुम्हाला कॉल केला."
"थँक्यू ! मी बघतो घरी जाऊन."
रवीनं अरुला फोन लावला. 3-4 वेळा लावला पण तिनं उचलला नाही. आता त्याला तिची खूप काळजी वाटू लागली. थोडया वेळात येतो असं स्टाफला सांगून पराठा शॉपच्या बाहेर पडला. त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं.
"अरुनं तयारी तर केली होती रिहॅबला जायची. मग पोहोचली का नाही? कुठे गेली असेल? काय करत असेल?"

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

स्वीकार भाग 10

स्वीकार भाग 9 इथे वाचा
"अरु दार उघड." राधानं आराधनाला आवज दिला.
"अरु मावशी बाहेर ये प्लिज."
"बाळा असं नको करु."
"अरु प्लिज ऐक आमचं."
सगळे बोलले पण अरुने दार उघडले नाही. तिनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करु नये हिच भीती सगळ्यांच मन खात होती. अर्णव रेस्टॉरंट रिसेप्शन वर रूमची डुप्लिकेट चाबी घ्यायला गेला.
"मी गॅलरीतुन आत जातो आणि दार उघडतो."अमन म्हणाला.
"अमन तु जा. दार उघडू नकोस. लपून फक्त अरुवर लक्ष ठेव."
"का?"
"मला वाटतं की दार तिनं स्वतः तिच्या इच्छेनं उघडावं.  अन बघ ती उघडनार दार. ती स्वतःच येईल बाहेर. तिला थोडा वेळ हवा." पूर्वा म्हणाली.
"अरु का गं अशी वागतेस? तु यांचं दिवसाची वाट पाहत होतीस ना. रवी बोलला आज त्याच्या मनातलं. तुही बोल. मोकळी हो." राधा अरुला म्हणाली.
रवीला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, "मला वाटतं मी खूप दुखावलं तुला अरु. मोठी चूक केली. मला माफ कर. मी परत कधीच तूझ्या समोर नाही येणार. जातो मी." तो तिथून जाऊ लागला. तोच अरुनं दार उघडलं.
"रवी थांब." अरु म्हणाली, "मला काही कळत नाही काय होतंय? खूप भीती वाटतेय. हे सगळं स्वप्न आहे. मी जागी होईल अन स्वप्न भंगून जाईल." अरु खाली बसून रडू लागली.
"अरु रडायचं आहे रड. त्यात काहीच गैर नाही."पूर्वा तिला म्हणाली, "रवी आराधनाला आत ने." रवी आणि राधा अरुला हात धरून आत घेऊन गेले.
"तुम्ही लोकं जा बर्थडे पार्टीला."
"आई असं कसं म्हणतेय तु? आराधनाला सोडून नाही जाणार आम्ही."
"अरे तिला शांततेची गरज आहे. समजून घे फुलराणी. आम्ही येतोच थोडयावेळात अरुला घेऊन."
"ओके आम्ही बागेत बसतो मग. तुझं झालं की सांग. मॅनेजरला बाहेरच डिनर लावायला सांगेल."
"गूड."
पूर्वानं रूम सर्व्हिसला फोन करून निंबू शरबत आणायला सांगितलं. ती आराधना जवळ गेली. "अरु तुला जे योग्य वाटेल ते कर. कोणाचीही जोर जबरदस्ती नाही. फक्त ताण घेऊ नकोस." वेटर निंबूशरबत घेऊन आला, "हे शरबत घे आणि आराम कर. तु म्हणशील तर इथे बसतो आम्ही नाहीतर बाहेर जातो."
"नाही इथेच बसा माझ्याजवळ." निंबूशरबत पिऊन ती शांत बसली.
"मी येतो बाहेर काय चाललं ते पाहून." रवी बाहेर जायला उठला.
"थांब." अरुनं त्याला थांबवलं," मला बोलायचं आहे तूझ्याशी."
"हो तुम्ही बोला. मी आणि राधा बघते बाकीच्यांच काय सुरु आहे ते." पूर्वा आणि राधा बाहेर गेल्या.
"सॉरी."
"कशाला."
"मी असं रिऍक्ट केलं म्हणून."अरु रवीला म्हणाली, "पण हेच माझं सत्य आहे. हे माझे बदलते मूड्स माझ्या मृत्यूसोबतच संपतील."
"अरु प्लिज असं बोलू नकोस."
"हो पण हे खरं आहे. होऊ शकतं पुढे चालून तुला माझ्या अशा मूड स्विंग्जचा कंटाळा येईल. जेव्हा आजूबाजूची लोकं माझा अस्वीकार करतील, तुला एका असायलम मधून आलेल्या बाईचा नवरा म्हणतील, तेव्हा तु मला सोडून देशील."
"हे काय बोलतेय तु?"
"जे घडू शकतं ते बोलतेय. म्हणून मला वाटतं की तु आधी काही दिवस माझी वागणूक बघ. मला चार लोकात तुझी होणारी बायको म्हणून मिरव आणि नंतरच काय तो निर्णय घे. उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस."
"ठीक आहे तु जे म्हणशील ते."मग थोडा विचार करून तो म्हणाला, " तु माझ्या रेस्टॉरंट मधे काम करशील, माझ्यासोबत दिवसभर राहा म्हणजे तुलाही मला समजून घेता येईल आणि मला तुला... हवं तर काही दिवस मी राधाकडेच राहायला येतो. म्हणजे तुझी संपूर्ण दिनचर्या मला समजेल."
"चालेल."
"Done." रवीनं हात पुढे केला.
"Done." अरुने त्याच्या हातात हात दिला.
फ्रेश होऊन ते दोघं बागेत गेले. डिनर लावलेला होता. रोमँटिक मधुर संगीत सुरु होतं. कोणीही काहीही प्रश्न विचारणार नाही, हे पूर्वानं आधीच सगळ्यांना सांगितलं होतं. त्यामुळे कोणीच काही विचारलं नाही. टेबलवर मेनबत्त्या लावण्यात आल्या. कॅण्डल लाईट डिनर असाच असतो ना. हसत बोलत जेवण झालं.
ट्रिपवरून सर्व आनंदात पुण्याला परतले. अरुनं तिचा पुण्यातच राधासोबत राहायचा आणि रवीबाबतचा निर्णय महेशला सांगितला.
"तुझ्यावर मी माझं मत लादणार नाही. पण प्लिज यावेळी निराश होऊन परत काही उलट सुलट करु नकोस. मी माफ नाही करु शकणार स्वतःला."
"नाही दादा. तसं होणार नाही. काही असलंच तर मी सांगेल तुला आणि हा स्मार्ट फोन आहेच ना. मी रोज व्हाट्सऍप व्हिडीओ कॉल करून बोर करत जाईल तुला."
"चालेल गं अरु." रिया म्हणाली, "महेशचा खूप जीव आहे तूझ्यात. काळजी घे स्वतःची."
"हो." अरुनं रियाला मिठी मारली, "तु दिलेला ड्रेस खूप सुंदर आहे. थँक्यू."
"तुझा हक्क आहे तो. अजून खूप काही द्यायचं आहे तुला. चल लंडनला आमच्याकडे."
"आता नको."
"ठीक आहे."
10 तारखेला रवीच्या रेस्टॉरंटच उदघाट्न झालं. महेश, रिया, अर्णव आणि अरुचे आईबाबा लंडनला परत गेले. अमनची सुट्टी संपली. तो कॉलेजला परत गेला. त्यानी आणि फुलराणीनं बोलून ठरवलं की लग्न तो नेव्ही ऑफिसर झाल्यावरच करेल. जे योग्यच आहे आणि फुलराणीला पुस्तक लिहायला नवीन विषय सुद्धा मिळाला होता, "मनोरुग्णाचा स्वीकार!" पूर्वानं अरुची सगळी जबाबदारी पुण्याच्या एका सायकीऍट्रीस्टला सोपवली आणि ती फुलराणीसोबत दिल्लीला परत गेली.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...