Friday, 9 August 2019

ते मुल आहे माझे

शारदाचा आई होण्याचा प्रवास खूपच आनंददायी होता. पंचविशी पार झाल्यामुळे ती म्हणतच होती की लग्न झाल्या बरोबर बाळ होउ देईल. तिच्या मना सारखं झालं सर्व. पण ह्या पुढ़चा प्रवास फार कठीण आहे हयाची तिला अजिबात कल्पना नव्हती.
पहिली लढाई तर आई सोबतच झाली. मे महिण्याची गरमी आणि आईचा बाळ आणि बाळंतनिला एसी किंवा कूलर मधे न ठेवण्याचा तगदा, म्हणे बाळाच्या कानात हवा शिरते. फक्त वरण, तूप आणि पोळीच खायला देने. इतर काही खाल्ले तर बाळाचे पोट फुगेल. आईवर झालेल्या संस्कारांमुळे आणि अनुभवाने त्यांना ते योग्य वाटत होते. डाॅक्टरांचा कशालाच नकार नाही. शारदालाही आईचं पटले नाही. काही पथ्य ठिक आहे पण इतक्या गर्मित बाळाला लु लागेल म्हणून ती त्यांचे काही ऐकायलाच तयार नव्हती. कदाचित बाळंतपणा नंतर होणारया हार्मोनल चेंजेसचा हा परिणाम असावा. म्हणून मग ११ दिवस झाल्यावर तिचा नवरा सागर तिला घरी घेऊन गेला. तर एक नविन नाटक सुरू झाले.
बाळ एकीकडे मान टाकून एकाच दिशेला पाहत राहायचं म्हणून सासुबाईंची आपली शंका,"एकीकडेच मान टाकतो. मानेत काही प्राॅब्लेम तर नाही ना?" मग काय मानेला लावायच्या उशा आणल्या. पण उशा लावल्या की बाळ रडायचं. शेवटी डाॅक्टरांनी सांगितलं की काही नवजात मुलं टाकतात अशी मान तिच्यात जिव येईपर्यत, तेव्हा सासुबाई शांत झाल्या.
बाळ सहा महिन्याचं होताच शारदाने डाॅक्टरच्या सल्ल्याने बाळाला फळांची चव द्यायला सुरू केलं आणि सातुची खिर चालू केली. कारण तिला दुध फार कमी येत होतं. बाळाला दात येउ लागले आणि तो वेळी अवेळी शी करू लागला. खापर हिच्या फळांच्या चविवर फोडल्या गेलं.
पुढे बाळ तिन - चार वर्षाचं होतेय तरीही स्पष्ट बोलत नाही म्हणून आजुबाजुचे त्यांचे मुलं कधी, कसे व किती लवकर बोलायला शिकले ते सांगायचे सोबत सल्लेही द्यायचे,"सहद चाटव, गळा साफ करून घ्या, कसलीशी वटी खाउ घाला, स्पिच थेरपी सुरू करा ...." तिने सर्व सल्ले ऐकले आणि केले मनाचे. तिला कळत होतं की सर्वच मुलांची डेव्हलपमेंट सारखी होत नाही. तेव्हा बाळाला आपण आणखी थोडा वेळ द्यायला हवा. कारण बाळ काही अगदी मुके नव्हते. ते बोलायचे. अगदी गळा फाडून ओरडायचे. फक्त नक्की काय बोलतो ते समजत नव्हते. हळूहळू ही गोष्टही साॅल्व झाली. बाळ बोलु लागलं तेही काही थेरपी वगैरे न घेता.

आता सहा वर्षाच्या बाळाला शाळेत टाकायची वेळ झाली. परत सल्ले मिळू लागले, अनुभवाचे गोडवे ऐकवू लागले. ही शाळा चांगली इथेच टाक, तिथे नको, तिथं का टाकलं? तिथलं शिक्षण स्लो आहे, तिथलं फास्ट आहे. पण तिला कळत होतं की तिच्या बाळाला कशी शाळा हवी आहे ते. त्यात असेच आपण सर्वांचं ऐकत बसलो तर पुढे परिस्थिती आणखी कठीण होईल म्हणून यावेळी तिने सर्वांना बोलून दाखवलं,
"ते मुल आहे माझं. मि जे ही करेल, करतेय ते भल्यासाठीच करते त्याच्या आणि जे गरजेचे आहे तेच करते. माझ्या शरीराबाहेर वाढनारं माझंच एक अंग आहे, ते मुल आहे माझं. मलाच माहिती असेल ना की त्याला नक्की काय हवं आहे? उगिच नसते सल्ले देउन माझा गोंधळ वाढवू नका. कारण ते मुल आहे माझं !"
ह्या तर अगदीच थोड्या समस्या मि इथे मांडल्या आहेत. एका आईला तर पावलोपावली समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात नाव ठेवणार्यांची आणि सल्ले देणार्यांची गर्दी ! म्हणून वेळीच आईनेही स्ट्राॅंगली अशांना सांगायला हवं की,"ते मुल आहे माझं आणि मला माहीतेय त्याला कसं मोठं करावं !"

धन्यवाद !

published on momspresso.com


@अर्चना सोनाग्रे वसतकार

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...