Friday, 9 August 2019

गर्भनिरोधक

काव्या खुप चिंतातुर होती. तशी I pill घेतली होती तिनं सकाळी उठताच. पण पाळीची तारीख जाउन आठ दिवस झाले तरीही अजुन पाळी आली नव्हती. त्यात सारखं मळमळ, डोकं दुःखी आणि चक्कर येणे सुरूच होतं. सगळी लक्षणं दिवस राहिल्याची दिसत होती. I pill घ्यायची तिची पहीलिच वेळ होती त्यामुळे तिला हे कळलंच नाही की वरची सर्व लक्षनं प्रेग्नेंसीची नसून त्या आय पिलचे ते साइड ईफेक्ट आहेत. मोहीत घरी येताच काव्याने तिची चिंता त्याला बोलून दाखवली. तेव्हा तो एकदम लाइटली म्हणाला,"अग हे साइड ईफेक्ट आहेत आय पिलचे. येइल पाळी २-३ दिवसांत."
"थोडीशी डोकं दुखिही सहन नाही होत या बाईला.", तो बाथरूम मधे जात बडबडला. काव्याला खुप वाईट वाटलं पण ती काहीच बोलली नाही. कंटाळली होती. त्यांच्यासोबत वाद घालन्यात तिला काही अर्थच वाटत नव्हता. एक वर्षाची मणी बेडवर शांत झोपुन होती. मोहीतला न सांगताच काव्या पर्स घेउन बाहेर गेली. तिच्या मनात संतापाचं वादळ आलं होतं. पण भांडणानं ते शांत होणारं नव्हतं.
लग्न झाल्यावर दुसर्याच महीन्यात गुड न्युज (इतरांसाठी, तिला इतक्यात बाळ नको होते.) मिळाली. मणी एक वर्षाची होत नाही तो परत काव्याला दिवस गेले. डाॅक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घेउन गर्भ पाडला आणि काव्याने महिन्याच्या गर्भनिरोधक गोळ्या घेणं सुरू केलं. पण तिची तब्येत सारखी खराब राहू लागली म्हणून मग गोळ्या बंद केल्या आणि काॅपर टी बसवली. पण पहिल्याच महीन्यात पाळीला अति रक्तस्राव झाला आणि तिला रक्त द्यावं लागलं. म्हणून काॅपर टी काढून टाकली. म्हणून मग आय पिल हा नविन उपाय मोहीतने शोधून काढला. पण काव्याला ह्या पिलमुळेही त्रास होतोय हे ऐकुन त्याला तिचाच राग आला.
"मला न सांगता, मणीला एकटं सोडुन कुठं गेली होती ?" काव्याने घरात पाय टाकताच मोहीत तिला विचारू लागला. तिनं काहीच न बोलतां वर्तमानपत्राच्या छोट्या लिफाफ्यात असलेलं एक पाकीट त्याच्या हातात दिलं.
"हे काय ?"
"उघडून बघा."
"क.....क.....काॅ..." पाकीटातली वस्तु पाहून तो अवाक झाला."तु आणलंस ?"
"हो, मीच आणलं !" मणीला पदराआड घेउन दूध पाजत ति,"आतापर्यंत खुप सहन केलं मि. आता करणार नाही. आजपासून माझ्या जवळ यायचे असेल तर याच्यासहच."
काव्या आज मोहीतला खुप वेगळी आणि नविन वाटली. नक्की काय बोलावं त्याला कळत नव्हतं. कारण आजपर्यंत ती कधीच त्याच्या शब्दाबाहेर गेली नव्हती. मग आज.....

"माझं खुप डोकं दुखतंय म्हणुन मि डिनर बनवला नाही. तेव्हा बाहेर घेउन चला नाहीतर मॅगी बनवून द्या." हे ऐकुन तर मोहीत अवाक झाला. त्याला नव्हतं माहीत आज दुर्गा देवी साक्षात त्याच्यासमोर अवतरली आहे.
"काय ठरवलं साहेब ?" मोहीतच्या गळ्यात हात टाकत काव्याने त्याला लाडात विचारले. कारण तो ती एक गोष्ट सोडली तर कुठेच कमी पडत नव्हता. तिला भांडण वगैरे नको होतं. फक्त तिला होणारया त्रासावर उपाय हवा होता. म्हणून तिनंही स्वताला शांत केलं होतं.
"बाहेरच जाउ. मि गाडी काढतो तु ये मणीला घेउन." हातातलं पाकीट खिशात ठेऊन तो हसतच बाहेर गेला. त्यालाही तो कुठेतरी चुकला हे समजलं होतं. जेव्हा तिनं नमतं घेतलं त्यालाही शांत राहण योग्य वाटलं.
मैत्रीणिंनो बोलत्या व्हा. सहनशीलतेच्या नावावर थोपवल्या जाणार्या गोष्टींना नकार द्या. स्वःताचे आरोग्य जपा. तेव्हाच परिवाराचे आरोग्य जपु शकाल.

धन्यवाद!

@अर्चना सोनाग्रे वसतकार


माझे लेख माझ्या नावासोबत प्रकाशीत करायला माझी काहीच हरकत नाही. धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...